भंडारदरा

                               भंडारदराभंडारदरा


रहस्य आणि रात्र यांचं अगदी जन्मजन्मांतरीचं नातं आहे. म्हणजे बघा ना, बंद खोलीतून रात्रीचा आवाज येतो. घनदाट जंगलात रात्रीच एखादी व्यक्ती येते आणि लिफ्ट मागते. मागे कोणीतरी असल्याची चाहूल लागते. भुताची मोठ्ठी सावली दिसते. या भुतांच्या भीतीने भानगढसारख्या किल्ल्यांवर तर रात्रीचा प्रवेशही दिला जात नाही. एवढंच नाही तर सगळ्या रहस्यमय मालिकाही रात्रीच दाखवल्या जातात. रात्रीच्या त्या काळ्याकुट्ट अंधारात, नीरव शांततेत एक वेगळीच गूढता निर्माण होते. म्हणूनच तर हे रहस्य आणि रात्रीचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट होतंय.

भंडारदरा


 
 या मानवनिर्मित रहस्यांव्यतिरिक्त निसर्गाचीही काही रहस्य रात्रीच्या ठोक्यालाच उलगडतात. अगदी रजनीगंधा, रातराणीच्या सायंकाळनंतर फुलण्यापासून ते ब्रह्मकमळाच्या मध्यरात्री उमलण्यापर्यंत !  असंच एक निसर्गाचं सोनेरी रहस्य ! ग्रीष्म ऋतूच्या अखेरीस आणि वर्षाऋतूच्या सुरुवातीस उलगडणारं ! वळवाच्या पावसानंतर हिरव्या पालवीवर सोनेरी झालर पांघरणारं ! हे रहस्य दडलंय कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या भंडारदरा, घाटघर, पांजरे, मुरशेत, चिंचोडी या आदिवासी खेड्यांच्या शिवारात अन् हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा मोठमोठाल्या वृक्षांच्या शिरपेचात ! ओळखा पाहू काय असेल हे सोनेरी रहस्य ?भंडारदरा


 
  हे सोनेरी रहस्य म्हणजे दुसरंतिसरं काही नाही. तो एक खेळ आहे..... "तो खेळ काजव्यांचा"! पावसाची चाहूल लागली की त्यांचं जीवनचक्र सुरू होतं. मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात त्यांचं आगमन होतं. सह्याद्री आपल्या विशाल बाहूंनी जणू त्यांचं स्वागतच करतो. सुरुवातीला मध्येच क्वचित दिसणाऱ्या या इटुकल्या काजव्यांची फौज वाढली की आकाशातले तारेच जणू पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. सामान्य रात्रीला सोन्याचे हजारो तारे लागतात आणि रात्रीचं सोनं होतं. वेगाने वाहणारा थंडगार वारा, पानांची सळसळ, सगळीकडे मिट्ट काळोख आणि शांतता अन् अशा गूढ वातावरणात काजव्यांनी तयार केलेली आभासी, मायावी सोनेरी दुनिया ! तासनतास न्याहाळत राहावी अशी ! म्हणूनच इथे दरवर्षी काजवा महोत्सवाचं आयोजन केलं जातं.भंडारदरा
      मोठमोठ्या झाडांच्या खोडांवर, पानं आणि फांद्यांवर लक्षलक्ष काजव्यांची दीपमाळ दिसते. कुठे मध्येच काजव्यांच्या प्रकाशफुलांची लकेर उमटते, तर कुठे शेकोटीतल्या निखाऱ्यांवरून उसळणाऱ्या ठिणग्यांसारखे काजव्यांचे झुळके दिसतात. ते पुन्हापुन्हा दिसण्यासाठी सगळेच अगदी वेडेपिसे होऊन वर पाहत राहतात. ज्याला जास्त वेळा ही सोनेरी आतषबाजी दिसेल तोच खरा "सिकंदर" असं वाटतं. त्यात जर एखादीच्या लांबसडक केसांत क्षणभरासाठी त्या काजव्याने स्वतःला माळून घेतलं तर ती अगदी सातवें आसमान पर असते. या निसर्गाच्या सोन्याची झळाळी खऱ्या सोन्यालाही येणार नाही, इतकं ते छान दिसतं.
भंडारदरा


   
 रात्रभर आपण उत्सुकतेने, कुतूहलाने "हा खेळ सावल्यांचा" पाहत राहतो. हळूहळू पहाट व्हायला लागते. सूर्यनारायण आपली किरणं चोहोबाजूंना पसरायला सुरुवात करतो. तांबडं फुटतं आणि रात्रीस चालणारा हा अद्भुत खेळ अखेरीस संपुष्टात येतो. आपल्याला पुन्हा रात्र कधी होईल याचे वेध लागतात, पण सकाळी मस्त नाश्ता करून आवरून पुढच्या पर्यटकांसाठी जागा रिकामी करायची असते. मनात एक हुरहूर लागते. दोन दिवसांचं बुकिंग करायला पाहिजे होतं असं वाटत राहतं, पण "एक रात में जो जन्नत हमने देखी, वो हर किसी को नसीब नहीं होती" हे समाधान मात्र असतं. मग पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग करत आपण आनंदाने एक वेगळंच समाधान घेऊन परतीच्या प्रवासाला निघतो.

Skylar Tours & Travels Private Limited

Office No. 4, Fourth Floor, Rutuja Residency, Near A.M. College, Manjri Rd, Hadapsar, Pune, Maharashtra 411028
Contact - +9189995 33699 https://g.co/kgs/QbV4Hu

Follow us on Instagram
https://www.instagram.com/skylar__travels

Like our Skylar adventures fb page
https://www.facebook.com/Skylar-Adventures-2124472650968611/

Subscribe our YouTube Channel
https://bit.ly/2V7tphg

Visit our Website
https://www.skylarcabs.com

Download The App
https://bit.ly/2IMbJRt

Like our Facebook Page
https://www.facebook.com/skylarcabs                                                      Credited By- Skylar Cab

                                                                       Thank You...

                                                                                                          
भंडारदरा भंडारदरा Reviewed by Mahidip Nature World on May 22, 2019 Rating: 5

No comments:

Hi freinds Please share your experience On comment box

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.